Pune Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख करुन महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करुन केली बदनामी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | इंन्स्टाग्रामवर महिलेसोबत ओळख करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Rape In Pune) ठेवले. त्यानंतर संबंध ठेवतानाचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करुन महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून 2023 मध्ये आयटी पार्क जवळ औंध बोपोडी येथे घडला आहे. याप्रकरणी एकावर खडकी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत 32 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ऋषिकेश रोहिदास पवार Rishikesh Rohidas Pawar (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर आयपीसी 376, 323, 506 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांची ओळख इंन्स्टाग्रामवर (Instagram) झाली. आरोपीने महिलेसोबत जवळीक वाढवून तिच्या पतीसोबत ओळख करुन घेतली. आरोपी महिलेच्या घरी आला त्यावेळी त्याला चहा देत असताना आरोपीने महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले. तसेच अश्लील बोलून धमकी दिली. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. तसेच शारीरिक संबंधाच्या वेळी मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवला. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करुन महिलेची बदनामी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील (PI Mansingh Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.