Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | 2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम ठरले आहे. या कालावधीत, मार्केटला अनेक मल्टीबॅगर स्टॉक मिळाले आहेत, ज्यामध्ये अनेक पेनी स्टॉक आहेत. कोरोना महामारी असतानाही मार्केटने चांगली कामगिरी केली आहे. Kwality Pharmaceuticals स्टॉक हा असाच एक स्टॉक आहे. (Multibagger Stock)

आशिष कोचलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला हा स्टॉक 26 डिसेंबर 2019 रोजी BSE वर रु. 25.55 वर दिसला तर 14 जानेवारी 2022 रोजी BSE वर हा स्टॉक रु 768.95 वर बंद झाला. सुमारे 2 वर्षांच्या कालावधीत, या स्टॉकमध्ये सुमारे 2900 टक्के वाढ झाली आहे.

Kwality Pharmaceuticals च्या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहता, गेल्या 1 महिन्यात तो 820 रुपयांवरून घसरून 768.95 रुपयांपर्यंत आला आहे. या दरम्यान शेअर 6 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 183 रुपयांवरून 768.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने या कालावधीत 320 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

त्याचप्रमाणे, आशिष कोचलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या एका वर्षात रू. 61 ते रू. 768.95 ची पातळी गाठली. या काळात या स्टॉकने आपल्या शेयरधारकांना 1160 टक्के रिटर्न दिला आहे.

26 डिसेंबर 2019 रोजी हा फार्मा स्टॉक बीएसईवर 25.55 रुपयांवर बंद झाला तर
14 जानेवारी 2022 रोजी हा स्टॉक 768.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
या काळात, गेल्या दोन वर्षांत या शेयरमध्ये 30 पट वाढ झाली आहे.

जर या स्टॉकची वाटचाल पाहिली तर, जर एखाद्याने 1 महिन्यापूर्वी क्वालिटी फार्मास्युटिकल्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 94,000 रुपयांवर आले असते.

 

दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 4.20 लाख रुपये मिळाले असते.

त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याला 12.60 लाख रुपये मिळतील.

2 वर्षंपूर्वी एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 30 लाख रुपये मिळाले असते.

Web Title :- Multibagger Stock | this multibagger stock worth rs 25 has made rs 1 lakh in 2 years to rs 30 lakh lets have a look at it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Personal Loan | कामाची बातमी ! पहिल्यांदा घेत असाल पर्सनल लोन तर ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्या- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Leave A Reply

Your email address will not be published.