Skip to content

NP NEWS 24 Marathi

  • English
  • Marathi
  • Hindi

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

by sandeep
EPFO Withdraw Rule | epfo withdraw rule check withdraw money twice from epf account for covid 19 emergencies process here
17th January 2022
ताज्या बातम्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO Withdraw Rule | देश कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेचा (Corona Third Wave) सामना करत आहे. अशा स्थितीत अनेक नोकरदारांना पुन्हा आर्थिक संकटातून जावे लागू शकते. कामगार मंत्रालयाच्या (Labour Minister Of India) म्हणण्यानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोविड-19 महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान पीएफ खातेधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आपल्या सदस्यांना दुसरा नॉन-रिफंडेबल (Non Refundable) कोविड-19 अ‍ॅडव्हान्स (Advance) घेण्याची परवानगी दिली होती. (EPFO Withdraw Rule)

यापूर्वी, महामारीच्या काळात सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) अंतर्गत मार्च 2020 मध्ये विशेष पैसे काढण्याची तरतूद करण्यात आली होती. या नियमानुसार, EPFO कर्मचारी त्यांच्या खात्यातून (EPF Account) तीन महिन्यांचा मूळ पगार आणि डीएचे पैसे काढू शकतात.

याशिवाय EPF खात्यातील 75 टक्के रक्कम, यापैकी जी कमी असेल ती काढता येते. हे पैसे काढण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हालाही पीएफ खात्यातून दुसर्‍यांदा पैसे काढायचे असतील, तर जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? (EPFO Withdraw Rule)

पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. सर्व प्रथम EPFO च्या युनिफाईड वेबसाइट https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर लॉग इन करा.

2. त्यानंतर तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.

3. यानंतर, ऑनलाइन सेवा पर्यायावर जाऊन क्लेमवर क्लिक करा (फॉर्म-31,19,10C, 10D)

4. तुमचे सर्व तपशील जसे की नाव, जन्मतारीख आणि तुमचा आधार क्रमांक तुमच्या स्क्रीनवर टाका. त्यानंतर एक वेबपेज उघडेल.

5. येथे तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक टाका आणि नंतर Verify वर क्लिक करा.

6. बँक खाते क्रमांक व्हेरिफाय केल्यानंतर, प्रोसीड फॉर क्लेम वर क्लिक करा.

7. यानंतर PF Advance (फॉर्म 31) वर क्लिक करा.

8. नंतर महामारीचा उद्रेक (COVID-19) म्हणून पैसे काढण्याचा पर्याय निवडा.

9. यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका, त्यानंतर सबमिट करा.

10. तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

 

उमंग अ‍ॅपद्वारे पैसे काढायचे?

स्टेप 1 : उमंग अ‍ॅपवर लॉग इन करा.

Step 2 : EPFO निवडा.

स्टेप 3 : एम्प्लॉई सेंट्रिक सर्व्हिस निवडा.

Step 4 : ’रेझ क्लेम’ ऑपशन निवडा.

स्टेप 5 : तुमचा UAN एंटर करा आणि खात्यात लॉग इन करण्यासाठी ओटीपी मिळवा वर क्लिक करा.

Step 6 : OTP नोंदवा आणि लॉगिन वर क्लिक करा. खात्यात यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक प्रविष्ट करा आणि ड्रॉप डाउन मेनूमधून सदस्य आयडी निवडा आणि प्रोसीड फॉर क्लेम वर क्लिक करा.

स्टेप 7 : येथे तुम्हाला तुमचा पत्ता नोंदवावा लागेल. योग्य तपशील टाकल्यानंतर ’Next’ वर क्लिक करा.

Step 8 : चेक इमेज अपलोड करा. एकदा सर्व तपशील आणि आवश्यक माहिती नोंदवल्यानंतर, तुमचा क्लेम फाईल केला जाईल.

Web Title :- EPFO Withdraw Rule | epfo withdraw rule check withdraw money twice from epf account for covid 19 emergencies process here

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Personal Loan | कामाची बातमी ! पहिल्यांदा घेत असाल पर्सनल लोन तर ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्या- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Winter Health Tips | चहाऐवजी ‘या’ 3 प्रकारच्या काढ्यांचे करा सेवन, जो बचाव करेल सर्दी-ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून

Tags: #Covid 19advanceBank accountCorona Third WaveEPFepf accountEPFOEPFO NewsEPFO News marathi newsEPFO News todayEPFO News today marathiEPFO Withdraw RuleEPFO Withdraw Rule NewsEPFO Withdraw Rule News marathi newsEPFO Withdraw Rule News todayEPFO Withdraw Rule News today marathilabour ministerlabour minister of indialatest EPFO Newslatest EPFO Withdraw Rulelatest marathi newslatest news on EPFO Newslatest news on EPFO Withdraw Rule Newsmarathi in EPFO Newsmarathi in EPFO Withdraw Rule NewsNon RefundablePMGKAYtoday's EPFO Newstoday’s EPFO Withdraw Rule Newsअ‍ॅडव्हान्सकर्मचारी भविष्य निर्वाह निधीकामगार मंत्रालयकोविड 19नॉन-रिफंडेबलपीएफ खातेप्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजबँक खाते

  • Next Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात
  • Previous Personal Loan | कामाची बातमी ! पहिल्यांदा घेत असाल पर्सनल लोन तर ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Sunil Tingre-Jagdish Mulik

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांची चंदननगर भागात पदयात्रा, महायुतीला भरघोस मतदान करण्याचे आवाहन

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय वातावरण...

14th November 2024
ताज्या बातम्या राजकीय
Supriya-Sule-

Supriya Sule On Reels | सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रिल्स वर भाष्य; म्हणाल्या – ‘पाच मिनिटे…’

पुणे : Supriya Sule On Reels | गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार...

24th June 2024
ताज्या बातम्या

NP NEWS 24 Marathi © 2025. All Rights Reserved.

Powered by WordPress. Theme by Alx.