राज्यात नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेसचे मंत्री म्हणाले…

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशात सर्वत्र गदारोळ सुरू असून काही राज्यांनी यास स्पष्ट विरोध केला आहे. महाराष्ट्र याबाबत कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच यावर काँग्रेच्या एका मंत्र्यांने सूचक वक्व्य केले आहे. केंद्रीय नेतृत्त्वाकडून झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू, असे महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

नागरिकत्व विधेयकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभा आणि राज्यसभेत विरोध केला आहे. परंतु, लोकसभेत शिवसेनेच्या सर्व खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता. काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेतील मतदानावर बहिष्कार टाकला होता. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेत असून नागरिकत्व कायद्याला काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध तर शिवसेनेची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे. त्यामुळे राज्यात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याबाबत महाविकास आघाडी कोणती भूमिका घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडच्या निर्णयावर आम्ही निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता शिवसेनाही स्पष्ट भूमिका घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.