Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke | अहमदनगर मधील निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली; जाणून घ्या

0

अहमदनगर : Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke | पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha) राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Sharad Pawar NCP) मोठे यश मिळाले. यामध्ये १० मदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले होते त्यातील ८ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे हाती पक्ष चिन्ह नसले तरी नवीन मिळालेल्या चिन्हावर शरद पवार गटाने आपली ताकद या निवडणुकीच्या निकालातून दाखवून दिली आहे. पवारांनी जिंकलेल्या या ८ जगांमध्ये अहमदनगर दक्षिणचाही समावेश आहे. जिथे आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला होता.

मात्र, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता मतमोजणीवर आक्षेप घेत EVM आणि VVPAT च्या मोजणीची मागणी केली असून, त्यासाठी आवश्यक असलेले शुल्कही भरले आहे. या सर्व घडामोडींमुळे नवे खासदार निलेश लंके यांनी धाकधूक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याचबरोबर निवडणुकीचा निकाल बदलणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर उभा असलेला उमेदवार ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरच्या चाचणीची मागणी करू शकतो.

ज्या उमेदवाराने पडताळणी याचिका दाखल केली आहे त्याला कोणत्या मतदान केंद्राच्या ईव्हीएमची पडताळणी करायची आहे त्या EVM चा अनुक्रमांक काय आहे हे सूचित करावे लागेल. अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना ५,९५,८६८ तर नीलेश लंके यांना ६,२४,७९७ मते मिळाली.

भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यानंतर अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सुजय विखेंची तक्रार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. सुजय विखे यांनी एकूण ४० ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

यामध्ये एका केंद्रावरील EVM ची पडताळणी करण्यासाठी ४७ हजार २०० रुपये इतके शुल्क असून, विखे यांनी ४० केंद्रांवरील पडताळणीसाठी एकूण १८ लाख ८८ हजारांचे शुल्क भरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.