Citizen Amendment Act : आता ‘सर्वोच्च’ लढाई; ११ याचिका दाखल

Citizen Amendment Act

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मोदी सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात मोठा विरोध होत असून ईशान्य भारतात मोठी आंदोलने सुरू आहेत. या नव्या कायद्याची लढाई आता सर्वोच्च न्यायालयातही पोहचली आहे. आज दुपारपर्यंत सर्वोच्च न्यायालयात नव्या वादग्रस्त कायद्याविरोधात ११ याचिका दाखल झाल्या आहेत.

लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. परंतु, हा कायदा वादग्रस्त ठरला असून ईशान्य भारतातील जनता त्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. या कायद्याविरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीग, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, पीस पार्टी, रिहाई मंच आणि सिटिझन अगेन्स्ट हेट, काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, एहतेशम हाश्मी, प्रद्योत देव बर्मन, जन अधिकारी पक्षाचे महासचिव फैजउद्दीन, माजी उच्चायुक्त देव मुखर्जी, अ‍ॅड. एम. एल. शर्मा आणि सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी एकुण ११ याचिका दाखल केल्या आहेत.

visit : npnews24.com