शिवसेनेची केंद्रात मोदी सरकारला साथ, दुटप्पी भूमिकेवर काँग्रेस नाराज; हुसेन दलवाई म्हणाले…  

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकासाठी शिवसेनेच्या खासदारांनी मोदी सरकारला साथ देत विधेयकाच्या बाजूने मतदान केले आहे. या विधेयकावर काँग्रेस आक्रमक झालेली असताना शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नाराज झाली आहे. याबाबत नाराजी व्यक्त करताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नाही, असे शिवसनेने म्हटले होते, मग असे का केल ते कळत नाहीत.

दलवाई म्हणाले, नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका शिवसेनेला घेता आली असती. मात्र, त्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही. समाजात फूट पाडण्यासाठी नागरिकत्व विधेयक आणलेले आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे. हे विधेयक संविधानाला धरुन नाही. भाजपा राज्यघटना मानत नाही, अशी नाराजी दलवाई यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करून शिवसनेने सत्तास्थापन केली आहे. मुख्यमंत्रीपदावर स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बसलेले असताना येथील मित्रपक्षांच्या विरोधात केंद्रात वेगळी भूमिका शिवसेनेने घेतल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.