एकनाथ खडसे भाजप सोडणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याने केले ‘हे’ भाष्य

0

ठाणे : एन पी न्यूज 24 – पक्षावर नाराज असलेले ज्येषठ नेते एकनाथ खडसे हे भाजपला जय श्रीराम करणार, अशी चर्चा सध्या राज्यात रंगली असतानाच यावर शिवसनेच्या बड्या नेत्याने मोठे भाष्य केले आहे. एकनाथ खडसे हे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ शकतात, असे शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

पक्षाने दिलेली अपमानास्पद वागणूक आणि मुलीच्या पराभवाने दुखावलेले ज्येष्ठ नेते एकनाथ हे सध्या जाहीर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. ते भाजप सोडणार, अशी चर्चा रंगलेली असतानाच खडसे यांनी इतर पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. खडसे यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीबाबत बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, एकनाथ खडसे आणि आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कोणी कुठेही भेटू शकतो. ही लोकशाही आहे. एकनाथ खडसे हे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ शकतात.

शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे खडसे लवकरच भाजपला जय श्रीराम करतील, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.