पेस्ट कंट्रोलपेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून

Pest Control

एन पी न्यूज 24 – माशा, कोळी, झुरळ, ढेकूण, मच्छर, डास, पाल, उंदीर यांच्यामुळे अनेक आजार पसरतात. अनेकदा जीवाला धोकाही निर्माण होतो. बरेचजण पेस्टकंट्रोल करून घेतात. परंतु, पेस्टकंट्रोलने अन्य त्रासही होतात. यासाठी काही घरगुती उपाय केले तर चांगला फरक पडतो. पावसाळ्यात तर काही किटकांचा खूपच त्रास होतो. या किटकांपासून मुक्ती कशी मिळवावी याचे उपाय तुम्हाला सांगणार आहोत. शिवाय या उपायांनी कोणताही त्रास होत नाही.

कोळी : हे किटक अत्यंत विषारी असतात. त्वचेवर घासले गेल्यास लाल पुरळ आणि खाज सुटते. पाण्यात मीठ टाकून घरात स्प्रे करा

माश्या : यांच्या पायाला घाण लागलेली असते. यामुळे टायफॅयिड तसेच टीबी होऊ शकतो. कापूर जाळून घरात धूर करा

डास : मच्छर चावल्यास मलेरिया, चिकुन गुनिया, डेंग्यूसारखे आजार होण्याचा धोका असतो. लबाची वाळलेली पाने घरात जाळून धूर करावा

पाल : पाल अथवा तिची घाण अन्नात पडली तर असे अन्न जीवदेखील घेऊ शकते. यासाठी काळेमिरेची पावडर करून पाण्यात टाकून भतीवर स्प्रे करावी

ढेकूण : ढेकूण चावल्यास अंगावर खाज आणि इन्फेक्शन होऊ शकते. अंथरूणावर यांची कातडी पसरल्यास दमा होऊ शकतो. ढेकूण असलेल्या भागात qलबाचा स्पे करा

झुरळ : अन्नात त्यांची करडी, लाळ आणि घाण सोडतात. अशा अन्नामुळे विषबाध आणि युरिन इन्फेक्शन होऊ शकते. झुरळे असतील तेथे बqकग सोडा आणि साखर पसरवा

उंदीर : अन्न दुषित करतात. त्यांची घाण अन्नात मिसळल्यास लिव्हर, किडनी डॅमेज होऊ शकते. ज्याठिकाणी उंदीर राहतात तेथे कांद्याचे तुकडे टाका

मुंग्या : बॅक्टेरिया सोबत घेऊन चालतात. त्यामुळे दुषित होऊन त्यामुळे विषबाधा होऊ शकते. चावल्याने अ‍ॅलर्जी होते. मुंग्याच्या ठिकाणी टाल्कम पावडर टाका

visit : http://npnews24.com