Omicron Covid Variant | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी कोणती फळे आणि भाज्यांचे सेवन आवश्यक? जाणून घ्या सविस्तर

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Omicron Covid Variant | कोरोनाच्या काळात निरोगी राहण्यासाठी, immunity मजबूत करणे ही प्राथमिकता आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाने लोक हैराण झाले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट (delta variant) नंतर आता ओमिक्रॉन (Omicron) वेगाने पसरणारा प्रकार बनला आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी आहारात बदल करण्यावर डॉक्टर आणि तज्ज्ञ भर देत आहेत, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील. (Omicron Covid Variant)

फिटनेस तज्ञ सांगतात की, चांगल्या आरोग्यासाठी मजबूत इम्युनिटी असणे अत्यंत आवश्यक आहे. मजबूत इम्युनिटी तुम्हाला रोगांशी लढण्यासाठी मजबूत बनवते. मजबूत इम्युनिटीसाठी संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे.

संतुलित आहारामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असलेल्या डाळी आणि बिया नऊ आवश्यक अमीनो अ‍ॅसिड असतात जे मजबूत इम्युनिटीची गुरुकिल्ली आहेत. इम्युनिटी मजबूत करण्यासाठी आहारात कोणते पदार्थ घ्यावेत ते जाणून घेऊया. (Omicron Covid Variant)

हिरव्या भाज्यांचे करा सेवन (consume green vegetables)
ब्रोकोली, मटार, शिमला मिरची, पालक अशा हिरव्या पालेभाज्या खा. या सर्व भाज्या व्हिटॅमिन सी, निरोगी चरबी, फायबर आणि लोह यांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. जर तुम्ही कोविडपासून बरे होत असाल तर या भाज्यांचे सूप बनवून पिल्यास फायदा होईल.

आहारात करा फळांचा समावेश (Include fruits in the diet)
फळांमध्ये आरोग्यदायी ग्लुकोज, आहारातील फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीव्हायरल पोषक घटक असतात जे शरीर निरोगी ठेवतात.
फळांमध्ये संत्री आणि द्राक्षांचे सेवन करा, यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते, तसेच तुमची इम्युनिटी मजबूत होते.
नाश्त्यात फळांचे सेवन केल्याने तुम्ही तुमची भूक शमवू शकता, तसेच वजन नियंत्रित करू शकता.

बिया आणि सुक्या मेव्याचे करा सेवन (Consumption of seeds and nuts)
बिया आणि नट हे सेलेनियम, झिंक, प्रथिने आणि जीवनसत्त्वे ई, बी 6 चे सर्वोत्तम स्त्रोत आहेत.
जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही बदाम, ब्राझील नट्स, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता.

दुग्धजन्य पदार्थ देखील महत्वाचे (Dairy products are also important)
दूध, दही, लोणी, तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. हे सर्व पदार्थ शरीराचे पोषण करतात.
तूप साखर नियंत्रित करते आणि शरीराला ऊर्जा देते. दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत आहेत.
जर तुम्ही आधीच ओमिक्रॉनला बळी पडला असाल तर दही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

आहारात इतर पदार्थांचा करा समावेश :
मशरूम, मासे, अंडी यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ इम्युनिटी मजबूत करतात.

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Omicron Covid Variant | how to increase immunity in covid time know the best fruits and vegetables for improve immunity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weight Loss Tips | लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘या’ सोप्या पद्धतीने कमी करा पोटावर जमा झालेली चरबी

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 8,334 रुपये मासिक जमा केल्यास मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Fenugreek Seeds Benefits | मधुमेह आणि अ‍ॅसिडिटीपासून वजन कमी करण्यासाठी मेथी एक प्रभावी उपाय, जाणून घ्या कसे करावे सेवन

Leave A Reply

Your email address will not be published.