नैसर्गिक मेहंदी या आजारांवरही उपायकारक
पुणे : एन पी न्यूज 24 – तस पाहिलं तर नैसर्गिक मेहंदीचा उपयोग आपण केस चमकदार, निरोगी राहण्यसाठी करतो. किंवा हातावर काढण्यासाठी करतो. परंतु ही मेहंदी फक्त काही फक्त केसावर किंवा हातावर काढण्यासाठी उपयुक्त नाही. तर ही नैसर्गिक मेहंदी अनेक आजारांवर उपायकार आहे. कारण मेहंदीमध्ये अनेक औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे मेहंदी अनेक आजारांवर गुणकारी आहे.
* मेहंदी खालील आजारांवर उपायकारक आहे. *
१) आग आणि सूज : तुम्हाला एखाद्या गरम वस्तूचा चटका बसला. किंवा भाजले तुम्ही त्या ठिकाणी मेहंदी लावू शकता. कारण मेहंदी खूप थंड असते. त्यामुळे
आपल्याला आराम मिळू शकतो. तसेच काही लागलं आणि त्या ठिकाणी सूज आली. तिथेही आपण मेहंदी लावू शकतो.
२) डैड्रफ : केसांमध्ये होणार डैड्रफ हा मेहंदीमुळे जाऊ शकतो. आणि केसांच्या मुळाशी येणारी खाज येणे थांबू शकते. फक्त केसांना मेहंदी लावताना त्यात
लिंबू आणि दही घालावे.
३) पोटाचे आजार : पोटांच्या अनेक आजरावर मेहंदीची पाने गुणकारी आहे. मेहंदीची पाने अतिशय गुणकारी असतात. त्यामुळे मेहंदीच्या पानांमुळे अनेक पोटाचे अनेक विकार दूर होतात.
४) त्वचेसंबंधी आजार : त्वचेसंबंधी जर काही आजार असतील तर मेहंदीच्या झाडाच्या सालीचा काडा करून प्या. त्वचेसंबंधी आजारावर मेहंदीच्या झाडाची
साल गुणकारी आहे.
५) किडनी स्टोन : मेहंदीमध्ये मौलिक ऍसिड असते. ते किडनी स्टोनसाठी उपायकारक असते. मेहंदीची पाने जर पाण्यात उकळून १ महिना रोज पिले तर
किडनी स्टोनवर नियंत्रण करता येते.
visit : http://npnews24.com