योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे

0

पुणे : एन पी न्यूज 24 – कोणत्याही गोष्टीत योग्य बेनिफिट मिळवायचा असेल तर त्या गोष्टीत सातत्य असणे गरजेचे आहे. मग ती कोणतीही गोष्ट असो. योगासनांच्या बाबतीतही तसेच आहे. आपण जर दररोज न चुकता योगा केला. तर याचे आपल्याला खूप फायदे होतात. आणि नियमीत योगासने करणे हे सुदृढ आरोग्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे नियमित योगा हे आरोग्यसाठी चांगले तसचे फायद्याचे असते.

* नियमित योगा करण्याचे फायदे खालीलप्रमाणे *

१) नियमित योगा केल्याने मन शांत राहते. आणि कोणतेही काम आपण एकाग्रतेने करू शकतो.

२) नियमित योगा केल्याने वजन नियंत्रणात राहते. आणि आपण दिवसभर फ्रेश राहतो.

३) योगासने करण्याचा फायदा सगळ्यात जास्त आपल्या शरीराच्या अवयवांना होतो. त्यामुळे आपले शरीर लवचिक बनते.

४) नियमित योगासने केल्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

५) योगासने केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. तसेच योगासने आपल्याला वेगवेगळ्या आजारापासून दूर ठेवतात.

अशाप्रकारे आपण जर नियमित योगा केला तर आपले आरोग्य सुदृढ राहण्यसाठी मदत होते. त्यामुळे नियमित योगा करणे हे फायद्याचे तर आहेच पण , महत्वाचेही आहे.
visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.