कुठल्याही कागदपत्रांशिवाय उघडा SBI मध्ये ‘अकाऊंट’, ‘या’ सुविधा एकदम फ्री मिळणार, जाणून घ्या

एसबीआय

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी खास एक नवीन खाते उघडण्याची संधी देणार आहे. ज्या व्यक्तींकडे योग्य कागदपत्र नाहीत अशा नागरिकांना हे खाते उघडता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला KYC करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज पडणार नाही. एसबीआयच्या अधिकृत बेबसाईट्वर यासंदर्भात सर्व माहिती देण्यात आली आहे. 18 वर्षांपुढील कोणताही व्यक्ती या योजनेत खाते खोलू शकतो.

झिरो बॅलेन्स खात्याची वैशिष्ट्ये

1) कसे खोलणार खाते
एसबीआयच्या अधिकृत बेबसाईट्वर दिलेल्या माहितीनुसार,हे खाते खोलण्यासाठी तुम्हाला बँक अधिकाऱ्याकडे एक सेल्फ-अटेस्टेड फोटोग्राफ आणि सही किंवा अंगठ्याचा नमुना जमा करावा लागणार आहे.

2)मिनिमम- मॅक्सिमम बॅलेन्स
या खात्यात कमीतकमी रक्कम ठेवण्याचे कोणतेही बंधन नाही. मात्र तुम्ही या खात्यात जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत रक्कम ठेवू शकता.

3)व्याज दर
अन्य खात्यांवर मिळणाऱ्या व्याजदरांप्रमाणेच या खात्यावर देखील व्याज मिळणार आहे.

4)ATM फ्री ऑफ कॉस्ट-
या खात्यावर तुम्हाला एक बेसिक रूपे कार्ड मिळणार असून तुम्हाला यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर यासाठी कोणतीही वार्षिक फी देखील आकारण्यात येणार नाही.

अटी

1) या खात्यावर तुम्ही 50 हजारापेक्षा जास्त रक्कम ठेवू शकत नाही.
2)त्याचबरोबर महिन्याला तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू शकणार नाही.
3) एका वर्षात १ लाखापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार होता कामा नये.
4)एका महिन्यात चारपेक्षा जास्त व्यवहार करता येणार नाहीत. यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही एसबीआयच्या https://www.sbi.co.in/portal/web/personal-banking/small-account या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता.