खा. उदयनराजेंनी अजून ‘तसा’ निर्णय घेतला नाही

0

सातारा :एन पी न्यूज 24 – गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. मात्र उदयनराजे यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट विधान केले नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी याबाबत संवाद साधला यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

मात्र त्यानंतर राष्ट्रवादीची धाकधूक वाढू लागली आणि उदयनराजेंच्या मनधरणी करण्याचे प्रकार सुरु झाले. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नसावे म्हणूनच स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनीही आता उदयनराजे यांची भेट घेतल्याचे समजते.

भेटीनंतर राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे यांनी अजून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे सांगितलं आहे. तसेच शेट्टी यांनी तुमची विरोधी पक्षाला गरज आहे, त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका अशी विनंती देखील यावेळी उदयनराजे यांना केली. आता उदयनराजे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.