Maharashtra Assembly Elections 2024 | विधानसभेसाठी मनसेची पोस्टरबाजी, वरळीत आदित्य ठाकरेंना पाडण्याचे आवाहन, बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप देशपांडेंना…

0

मुंबई : Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभेला भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणारा मनसे पक्ष आता विधानसभा निवडणुकांसाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्यावरून मनसेची नुकतीच खिल्ली उडवली होती. यामुळे आता मनसेने थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेच्या (MNS) वतीने वरळीमध्ये (Worli Assembly Constituency) बॅनर लावण्यात आले असून यामध्ये विधानसभेला आदित्य ठाकरे यांना पाडण्याचे आणि मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना आमदार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वरळीत हे बॅनर मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी लावले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना या बॅनरवर लिहिले आहे की, बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया, यंदा वरळीकरांचं ठरलंय, असा मजकूर या बॅनरवर आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात मनसे यावेळी संदीप देशपांडे यांना निवडणूक मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे येथून निवडूण आले आणि मंत्री देखील झाले होते. आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने प्रथमच २०१९ मध्ये विधानसभ निवडणूक लढवली होती. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात उमदेवार उभा केला नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.