NDA Modi Govt | सरकारची मोठी तयारी, बजेटमध्ये 15 ते 17 लाखापर्यंत कमवणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये लागू शकते लॉटरी!

0

नवी दिल्ली : NDA Modi Govt | पुढील महिन्यात केंद्र सरकार बजेट (Budget 2024) सादर करणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे. सामान्य माणसाला बजेटमध्ये मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे. अर्थ मंत्रालय बजेटमध्ये मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी प्राप्ती करातील सवलतीशी संबंधीत पर्यायांवर गांभिर्याने विचार करत आहे.

पीएम मोदी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, मध्यमवर्ग देशाच्या विकासाचा चालक आहे आणि त्यांचे भले आणि सुविधा ही आमची प्राथमिकता आहे. अशा वेळी नोकरदारांना या बजेटमध्ये सरकारकडून प्राप्तीकरात सवलतीची आशा आहे.

अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, नवीन कर प्रणालीमध्ये सरकार बदल करू शकते. वृत्त असे आहे की, १५ ते १७ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी प्राप्तीकराचे दर कमी करण्याबाबत सरकार विचार करत आहे. सरकारचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना नवीन कर प्रणाली अंतर्गत आणले जावे. वार्षिक १५ ते १७ लाख कमावत असलेल्यांना नवीन कर प्रणाली अंतर्गत कमी कराची तरतुद केली गेली तर यातून मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळेल. (Income Tax)

नवीन कर प्रणाली अंतर्गत सरकार ७ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर करात सवलत देते. तर जुन्या कर प्रणाली अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. यानंतर दोन्हीमध्ये ५० हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्‍शन सुद्धा लागू होते. म्हणजे नवीन कर प्रणाली अंतर्गत वार्षिक ७.५० लाख रुपयां पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.