Budget 2024 | कर सवलतीपासून पीएम किसान योजनेपर्यंत, अर्थसंकल्पात होऊ शकतात या मोठ्या घोषणा

0

नवी दिल्ली : Budget 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmla Sitharaman) अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कर सवलतीबाबत मोठी घोषणा करू शकतात. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, यावेळी अर्थसंकल्पात कर सवलत (Income Tax Exemption) मिळू शकते. यामुळे ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो. सध्या हे लोक ५ ते २० टक्के टॅक्‍स रेटचा सामना करत आहेत.

या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, केंद्र एक नव्या टॅक्स ब्रॅकेटवर विचार करत आहे. मात्र, सध्या यावर सविस्तर चर्चा सुरू आहे आणि अंतिम निर्णय अर्थसंकल्प सादर करण्याच्या दरम्यान घेतला जाईल. या कर बदलांमुळे संभाव्य महसूल घट होत असतानाही सरकार चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपीच्या ५.१% च्या आपल्या सरकारी तूटीचे लक्ष्य कायम राखण्यासाठी वचनबद्ध आहे.

पीएम किसानची रक्कम वाढू शकते

रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, सरकार पीएम किसान योजनेत देत असलेली मदतीची रक्कम वाढविण्यावर विचार करत आहे. वार्षिक ६००० रुपयांची रक्कम वाढवून ८,००० रुपयांपर्यंत करू शकते. तर किमान गॅरंटी योजनेच्या अंतर्गत पेमेंट वाढवणे आणि महिला शेतकरी वर्गासाठी आर्थिक मदतीचा विस्तार करू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.