Pune Traffic Updates | वानवडी, मुंढवा व कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल

0

पुणे : Pune Traffic Updates | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील वानवडी, मुंढवा व कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

वानवडी वाहतूक विभागांतर्गत फातिमानगर चौक ते पंचरत्न सोसायटी सोलापूर पुणे रस्त्याची व हॉटेल तंदूर ते फातिमानगर चौक पुणे सोलापूर रस्त्याची बाजू ५० मीटर अंतर नो पार्किंग, नो हॉल्टींग करण्यात येत आहे. तसेच ॲव्हेन्यु मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून उजव्या व डाव्या बाजूला ५० मीटर नो पार्किंग करण्यात येत आहे.

मुंढवा वाहतूक विभागांतर्गत अनंत थिएटर पासून घोरपडी पोलीस चौकीकडे जाणारा रस्ता विश्वलक्ष्मी चौक ते अनंत कॅन्टीन जंक्शनपर्यंत ५०० मीटर पी १, पी २ पार्किंग करण्यात येत आहे. कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत कोरेगाव पार्क लेन क्रमांक ७ रस्त्याच्या पूर्व बाजूस असणाऱ्या क्लोवर रॉयल सोसायटी प्रवेशद्वार (ए) ते क्लोवर पार्क व्यू सोसायटी प्रवेशद्वरापर्यंत एका बाजूला नो पार्किंग करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ३ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.