Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: मालकाच्या घरातील दागिन्यांवर कामगाराचा डल्ला, अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | धार्मिक कार्यासाठी गेलेल्या गॅरेज मालकाच्या घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेणाऱ्या दोघांना शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police Station) ताब्यात घेतले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हा प्रकार रविवारी (दि.15) सकाळी साडे नऊ ते मंगळवार (दि.17) रात्री साडे नऊच्या दरम्यान गहुंजे येथे घडला.

याबाबत विकास शिवाजी घोडेकर (वय-40 रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव भानुदास गंगाधरे (वय-19 रा. गहुंजे) याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे गॅरेज असून त्याठिकाणी अल्पवयीन मुलगा काम करतो.

फिर्यादी रविवारी कुटुंबासमवेत धार्मिक कार्यासाठी कासारवाडी येथे गेले होते. याचा फायदा घेऊन शिकाऊ कामगार अल्पवयीन मुलाने फिर्य़ादी यांच्या घरात प्रवेश केला. त्याने फिर्यादी यांच्या घरातील बेडरुममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकले. त्यामधील 1 लाख 98 हजार 500 रुपये किंमतीचे 40.410 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 25 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 23 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता फिर्यादी घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. घोडेकर यांनी याबाबत शिरगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.