Katraj Pune Crime News | पुणे : चाकूचा धाक दाखवुन लुटणाऱ्या साराईत गुन्हेगाराला अटक

0

पुणे : – Katraj Pune Crime News | बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या (Robbery Case) सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Record) भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. ही कारवाई कात्रज येथील आंबेडकर नगर (Ambedkar Nagar Katraj) येथे मंगळवारी केली. दिपक राजेंद्र वाघमारे Deepak Rajendra Waghmare (वय-19 रा. आंबेडकर नगर, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी 11 जून रोजी कात्रज चौक येथुन सोलापूर येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील 1300 रुपये काढून घेतले. तसेच मोबाईल घेत असताना फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता मारहाण केली. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर व निलेश ढमढेरे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपक वाघमारे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने केला असून ते आंबेडकर नगर कात्रज येथे थांबले आहेत. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे, नामदेव रेणुसे, शैलेश साठे, चेतन गोरे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन गाडे, विक्रम सावंत, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.