Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: खासगी सावकाराचा वसुलीचा तगादा, तरुणाची आत्महत्या

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | व्याजासाठी तरुणाला खासगी सावकाराने वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली (Suicide Case). ही घटना आळंदी-देहू रोडवरील (Alandi Dehu Raod) एका शेतात घडली. या प्रकरणी खासगी सावकारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वैभव पांडुरंग कवचट (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश रमेश लोंढे (Ganesh Ramesh Londhe) याच्यावर आयपीसी 306, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वैभव याचा भाऊ विशाल पांडुरंग कवचट (वय 24 रा. खंडोबामाळ, फुरसुंगी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाने गणेश लोंढे याच्याकडून काही कारणासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जाची मुद्दल आणि व्याज वेळेवर न दिल्याच्या कारणावरून आरोपी गणेश लोंढे याने वैभवकडे तगादा लावला होता. तसेच त्याला मारहाण करुन अपमानास्पद वागणूक दिली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैभव याने रविवारी (दि.16) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या पूर्वी आळंदी- देहू रोडवरील धनश्री हॉस्पिटलच्या पाठीमागील शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पठारे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.