Daund Pune Crime News | पुणे : टॉवेल वाळत घालताना बसला विजेचा शॉक, आई-वडिलांसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

0

दौंड/पुणे : – Daund Pune Crime News | विजेचा धक्का बसून एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दौंड तालुक्यातील दापोडी येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.17) सकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलगी सकाळी कोचिंग क्लासला गेल्याने ती घरात नव्हती. क्लासला गेल्यामुळे मुलगी वाचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सुरेंद्र देविदास भालेकर (वय 44), पत्नी अदिका सुरेंद्र भालेकर (वय 38), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय-17) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. भालेकर कुटुंब मुळचे सोलापूर येथील असून सध्या ते दौंड तालुक्यातील दापोडी येथे राहत आहेत. हे कुटुंब दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या खोल्या पत्र्यांच्या होत्या. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सुरेंद्र भालेकर सकाळी सातच्या सुमारास आंघोळीला गेले होते. आंघोळ करुन आल्यानंतर ते टॉवेल वाळत घालत होते त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आदिका प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. आई-वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा परशुराम याने त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी कोचिंगसाठी बाहेर गेल्याने ती या दुर्दैवी घटनेतून बचावली.

सुनील भालेकर हे कटुंबासोबत मागील पाच वर्षापासून दोपोडी येथे अडसूळ यांच्या खोलीत राहत होते. सुनील हे दापोडी-केडगाव परिसरात बांधकाम क्षेत्रात सेट्रिंगची कामे करत होते. त्याच्या घरात वीज पुरवठा केलेली वायर एका उभ्या असलेल्या पत्र्यावर टेकली होती. वाऱ्याने हलून हलून या वारचे वरील आवरण निघून गेले होते. तिथून वीज प्रवाह घरात उतरला होता. टॉवेल वाळायला घालायच्या तारेत वीज प्रवाह उतल्याने त्यांना विजेचा जोरात धक्का बसला.

सुनील भालेकर यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. दुसरा मुलगा गावी गेला आहे. तर मयत मुलगा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. पत्नी गावातील शेतात मजुरीचे काम करत होती. घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्युत कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.