Wholesale Inflation Increasing | घाऊक महागाईने दिला झटका, पण जीडीपीच्या बाबतीत CII ने चांगला अंदाज वर्तवल्याने दिलासा

0

नवी दिल्ली : Wholesale Inflation Increasing | घाऊक मुल्य महागाईमध्ये लागोपाठ तिसèया महिन्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी डेटानुसार, डब्ल्यूपीआयमध्ये २.६१ टक्के झाली, जी एप्रिलमध्ये १.२६ टक्के होती. हा फेब्रुवारी २०२३ नंतर भारतात दिसून आलेला घाऊक महागाईचा उच्च स्तर आहे.

भाजीने दिला महागाईचा झटका

मे मध्ये घाऊक मूल्य महागाईमधील वाढ प्रामुख्याने कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, खनिज तेल, खाद्य पदार्थ इत्यादीच्या दरातील वाढीमुळे झाली आहे. मे दरम्यान खाद्य पदार्थांचे दर ९.८ टक्के वाढले, तर एप्रिलमध्ये ७.७४ टक्के वाढले होते. सर्वात जास्त वाढ भाज्यांच्या दरात झाली. एप्रिलमध्ये भाज्यांच्या दरात २३.६० टक्के वाढ झाली होती. तर मे मध्ये ३२.४२ टक्के वाढ झाली.

किरकोळ-घाऊक महागाईत ताळमेळ नाही

डब्ल्यूपीआयमध्ये लागोपाठ तीन महिन्यांपासून वाढ होत आहे. तर, किरकोळ महागाईची स्थिती याच्या एकदम उलटी आहे, जी १२ महिन्याचा खालचा स्तर ४.७५ टक्के वर आली. किरकोळ महागाईचे महत्व अनेकदा जास्त असते, कारण आरबीआय आपले आर्थिक धोरण ठरवताना यास महत्व देते.

जीडीपीची ग्रोथ चांगली राहण्याची आशा

घाऊक महागाई वाढलेली असताना आर्थिक बाजूकडून एक चांगली बातमी आहे. इंडस्ट्री बॉडी सीआयआयचे म्हणणे आहे की, या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी ग्रोथ ८ टक्के राहू शकते. सीआयआयनुसार, भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्विसेस सेक्टरवर अवलंबून आहे. या सेक्टरला सतत वाढणारे सरकारी खर्च आणि चांगल्या मान्सूनचा लाभ मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.