Silver Decline | चांदीत प्रचंड घसरण, 2000 रुपयांनी कोसळला भाव, सोनेसुद्धा 600 रुपयांपर्यंत स्वस्त, जाणून घ्या पुणे-मुंबईतील दर

0

नवी दिल्ली : Silver Decline | तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल एक चांगली बातमी आहे. गुरुवार १३ जून २०२४ ला चांदीच्या दरात २,००० रुपयापर्यंची प्रचंड घसरण दिसून आली आहे. तर सोनेसुद्धा कालच्या तुलनेत ६०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत स्वस्त झाले आहे. चांदीच्या भावात २,००० रुपयांच्या घसरणीनंतर ती सध्या ८८,५०० रुपये प्रति किलोग्रॅमच्या जवळपास आहे. (Gold Silver Price)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात जबरदस्त घसरण दिसून आली आहे आणि ती कालच्या तुलनेत १९२१ रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत स्वस्त होऊन ८८,५२४ रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. बुधवारी वायदा बाजारात चांदी ९०,५५४ रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.

तसेच गुरुवारी एमसीएक्सवर सोने कालच्या तुलनेत ५८२ रुपयांनी स्वस्त होऊन ७१,३८८ रुपयांवर आले आहे. बुधवारी सोने ७१,९७० रुपयांच्या दरावर बंद झाले होते. परदेशी बाजारात देखील सोने-चांदीत मोठी घसरण झाली आहे.

मुंबईत २४ कॅरेट सोने ७२,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९०,७०० रुपये प्रति किलोग्रॅम विकली जात आहे. तर पुण्यात २४ कॅरेट सोने ७२,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९०,७०० रुपये प्रति किलोग्रॅम विकली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.