Cheating With US Woman | ज्वेलर्सने अमेरिकन महिलेला घातला गंडा, 6 कोटींमध्ये विकला 300 रुपयांचा बनावट दागिना

0

जयपुर : Cheating With US Woman | राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये एका ज्वेलर्स पिता-पुत्राने एका अमेरिकन महिलेला ३०० रुपयांची आर्टिफिशियल ज्वेलरी ६ कोटी रुपयांना विकली. पोलिसांच्या माहितीनुसार, अमेरिकन नागरिक चेरिशने सुमारे दोन वर्षापूर्वी जयपुरच्या गोपाळजी यांच्या रास्ता येथील एका दुकानातून खरेदी केलेल्या ज्वेलरीवर ६ कोटी रुपये खर्च केले होते. खरेदीच्या वेळी दुकानदाराने महिलेला हॉलमार्क सर्टिफिकेटसुद्धा दिले होते, ज्याद्वारे दागिन्याची शुद्धता समजत होती.

चेरिश, अमेरिकेला परत गेली आणि तिने एका प्रदर्शनात ज्वेलरी मांडली, जिथे तिला समजले की, ती बनावट आहे. यानंतर ती जयपुरला परतली आणि रामा रेडियम ज्वेलर्समध्ये गेली आणि दुकानाचा मालक गौरव सोनीला बनावट दागिन्यांची तक्रार केली. त्यांनी दागिन्यांच्या शुद्धतेसाठी अन्य दुकानांमध्ये सुद्धा पाठवले, जिथे तपासणीनंतर दुजोरा मिळाला. यानंतर चेरिशने अमेरिकन दूतावासाला या घटनेची माहिती दिली.

पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल
१८ मे रोजी ज्वेलर राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल झाला. या प्रकरणाबाबत मीडियाशी बोलताना जयपुरचे डीसीपी बजरंग सिंह शेखावत म्हणाले, पोलिसांनी दागिने तपासणीसाठी पाठवले, यातून समजले की दागिन्यांमध्ये लावलेले हिरे चंद्रमणी होते. दागिन्यांमध्ये सोन्याची मात्रा १४ कॅरटऐवजी दोन कॅरेट होती. आरोपी ज्वेलर्सने सुद्धा तक्रार नोंदवली होती की, अमेरिकन महिला त्यांच्या दुकानातून दागिने घेऊन पळून गेली आहे, परंतु जेव्हा आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा समजले की ही बाब खोटी आहे.

आणखी तक्रारी दाखल…
डीसीपींनी सांगितले की, प्रकरणात आरोपी ज्वेलर्स फरार आहे, परंतु आम्ही बनावट हॉलमार्क सर्टिफिकेट जारी करणारा नंदकिशोर यास अटक केली आहे. मुख्य आरोपी गौरव सोनी विरूद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. अमेरिकन महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांना या पिता-पुत्राबाबत आणखी काही तक्रारी मिळाल्या आहेत, ज्यामध्ये गौरव सोनी आणि राजेंद्र सोनी यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे, ज्यासंदर्भात तपास सुरू आहे.

अमरिकन महिला चेरिशने म्हटले की, गौरव सोनी आणि त्याच्या वडिलांनी (राम एक्सपोर्टचे मालक) माझी फसवणूक केली. त्यांनी मला १४ कॅरेटऐवजी नऊ कॅरेट आणि सोन्याची प्लेट पाठवली. मला हिरे पाठवण्याऐवजी पूर्णपणे मूनस्टोन दिला. सुमारे १० अन्य डिजायनर्ससोबत त्यांनी फसवणूक केली आहे. त्यांनी खोटे प्रमाणपत्र सुद्धा दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.