Kondhwa Pune Crime News | कोंढवा: महिलेचा पाठलाग करुन असभ्य वर्तन, तिघांवर गुन्हा दाखल

0

पुणे : – Kondhwa Pune Crime News | पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन तिचा व्हिडीओ काढला. हा प्रकार समजताच महिलेने याबाबत विचारणा केली असता तिच्यासोबत असभ्य वर्तन (Rude behavior) करुन विनयभंग केला (Molestation Case). तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पिडीत महिलेच्या पतीने शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 27 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अदनान शहा, शोएब अशपाक शेख, अरबाज अशपाक शेख यांच्यावर आयपीसी 354. 354(ड), 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शोएब शेख हे पती पत्नी असून ते विभक्त राहत आहेत. पतीकडून त्रास होत असल्याने आणि त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी अदनान याने महिलेचा वारंवार पाठलाग केला. मात्र, फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 28 मे रोजी रात्री फिर्यादी मुलाला घेऊन बेकरीत खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी अदनान याने महिलेचा पाठलाग केला. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादी यांचा व्हिडीओ काढला. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी अदनान याने फिर्यादी यांच्यासोबत असभ्य वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या प्रकरानंतर महिलेने तिच्या कुटुंबियांना बोलवून घेतले. आरोपी विरोधात तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी आरोपी पती व दीर पोलीस ठाण्यात आले होते. फिर्यादी यांना पाहिल्यानंतर त्याने अश्लील शिवीगाळ केली. तसेच मुलाला आमच्याकडे ठेव नाहीतर तुझ्याजवळ ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.