Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : तळजाई टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

0

पुणे : – Sahakar Nagar Pune Crime News | पहाटेच्या वेळी तळजाई टेकडीवर (Taljai Hills) मॉर्निंग वॉकला (Morning Walk) येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत (Robbery Case) असलेल्या पाच जणांवर गुन्हा दाखल करुन तीन जणांना अटक केली आहे. सहकारनगर पोलिसांनी (Shahakar Nagar Police Station) ही कारवाई गुरुवारी (दि.6) पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास तळजाई मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील कै. सदु शिंदे स्टेडीअमच्या जवळ असलेल्या सेल्फी पाँईंट येथे केली.

अमर अनंत काथवटे (वय-26 रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर, पुणे), अभिजीत श्रावण चंदनशिवे (वय-26 रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), ऋषीकेश उर्फ ऋषी राजु शिंदे (वय-26 रा. अरणेश्वर, पुणे) यांना अटक केली आहे. तर गणेश अनंत काथवटे (वय-25 रा. अरणेश्वर, पुणे), अमित उर्फ ऋद्यनाथ बाबु ढावरे (वय-22 रा. अरणेश्वर, पुणे) यांच्यावर आयपीसी 399 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर लाला सुतकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी तळजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सेल्फी पॉईंटच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला अंधारात काही तरुण बसले असून ते फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल पवार व नवनाथ शिंदे यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने तळजाई पठार येथे गेले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून गेले तर तीन जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता फिरायला येणाऱ्यांना लुटणार असल्याची कबुली दिली. आरोपींकडून लोखंडी हत्यारे, मोबाईल आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वंग्याणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळळे, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, किरण कांबळे, बजरंग पवार, महेश मंडलिक, अमित पद्माळे, विशाल वाघ, सागर कुंभार यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.