Blood Sample Tampering Case Pune | पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण: ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणाचा? मोठी माहिती आली समोर

0

पुणे : – Blood Sample Tampering Case Pune | पुण्यातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणाचा सखोल तपास पुणे पोलिसांकडून (Pune Police) करण्यात येत असून या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या अपघाताशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याच्या मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी उजेडात आली. त्यानंतर या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील (Sassoon Hospital) दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. आता या डॉक्टरांना रक्त बदलण्याचा सल्ला नेमका कोणी दिला याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अश्फाक मकानदार (Ashfaq Basha Makandar) आणि ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुला ऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती. तुमच्यावर कारवाई होईल, असा इशारा विशाल अग्रवाल याला मकानदार याने दिला होता. या भेटीनंतर विशाल अग्रवाल हा छत्रपती संभाजीनगर येथे पळून गेला. पोलिसांनी त्याला संभाजीनगर येथून अटक केली.

मकानदारला पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. सध्या मकानदार आणि गायकवाड या आर्थिक व्यवहार करणाऱ्या दोघांना 10 जून पर्य़ंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.