Wanwadi Pune Crime News | पुणे : महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, अश्लील शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर FIR

0

पुणे : – Wanwadi Pune Crime News | अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची संतापजनक घटना वानवडी परिसरात घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.4) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास रामटेकडी (Ramtekadi Pune) येथे घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 40 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश लक्ष्मण मिसाळ Akash Laxman Misal (वय-24 रा. रामटेकडी, हडपसर) याच्यावर आयपीसी 354, 354(अ), 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मुलगी जेवण करुन घरासमोरील मोकळ्या जागेत पायी चालत होत्या. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने अंगावरील कपडे काढून अश्लील हावभाव करुन दोघींच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या महिलेने आरोपीकडे याबबत जाब विचारला असता त्याने अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

लोणीकंद : तरुणीसोबत ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवले (Lure Of Marriage). त्यानंतर तिला घरी बोलवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे मुलीने लग्न कधी करणार आहेस अशी विचारणा करुन लग्न केले नाही तर तुझ्या गावी सांगेन असे सांगितले. त्यावेळी आरोपीने पिडीतेला लग्न करणार नाही असे म्हणून घरी गेलीस तर तुला बघून घेईन अशी धमकी दिली (Rape Case Pune). याबाबत 22 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल केला आहे. यावरुन प्रविण प्रतापराव मोरे (वय-26 रा. केसनंद फाटा, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे (PSI Monali Bhade) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.