Private Detective In Pune | पोर्शे कार अपघातानंतर पालकांची चिंता वाढली, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालकांकडून खासगी गुप्तेहेरांची मदत

0

पुणे : – Private Detective In Pune | पुणे शहरातील कल्याणी नगर (Kalyani Nagar Car Accident Pune) परिसरात एका पोर्शे कारने दोन जणांना धडक दिली. यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला होता. ड्रंक अँड ड्राइव्ह (Drunk & Drive) प्रकरणानंतर पुण्यासह देश हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तर परराज्यातील अनेक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. शिक्षण व नोकरीनिमित्त पुण्यात राहणाऱ्या आपल्या मुलाची मैत्री कोणासोबत आहे, ते पुण्यात कसे राहतात, तो किंवा ती पुण्यात काय काय करतात याची माहिती बाहेरुन काढण्यासाठी पालकांनी चक्क खासगी गुप्तेहाराची मदत घेत असल्याचे समोर आहे. मागील एका आठवड्यात 100 हून अधिक पालकांनी आपल्या मुलांची माहिती घेण्यासाठी डिटेक्टिव्हकडे चौकशी केली आहे.

पुणे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. येथे अनेक उच्चशक्षण देणाऱ्या संस्था आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पुण्यात पाठवत असतात. पुणे शहरामध्ये नोकरी किंवा शिक्षणासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा आदी राज्यांतून येणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. हे तरुण वसतिगृहात किंवा खासगी फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात. मात्र आतापर्यंत पालकांना मुलांची चिंता नव्हती. पण कल्याणी नगर परिसरातील अपघातानंतर त्यांची चिंता वाढली आहे.

पालकांनी पुण्यात राहणाऱ्या आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या (Swift Detective Agency) संचालिका प्रिया काकडे यांनी याला दुजोरा दिला आहे. आतापर्यंत देशातील विविध राज्यांमधून सुमारे चाळीस जणांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

प्रिया काकडे म्हणाल्या, आतापर्यंत देशातील विविध राज्यांमधून सुमारे 40 जणांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांची सेवा घेतलेल्या इंदूर येथील एका पालकाचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, या पालकांचा मुलगा फोन त्यांच्याशी नीट बोलत नव्हता. यामुळे त्यांचा संशय वाढला. पालक म्हणाले, जेव्हा ते आपल्या मुलाला फोन करतात तेव्हा तो व्यस्त असल्याचे कारण सांगतो. मित्रांकडे चौकशी केली असता ते सांगतात की, आम्ही आता त्याच्या संपर्कात जास्त नसतो. यामुळे शेवटी त्यांनी मुलगा नेमके काय करतो, हे जाणून घेण्यासाठी मला फोन केला.

Leave A Reply

Your email address will not be published.