Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद

0

पुणे : – Pune PMC Water Supply | वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे काम गुरुवारी (दि.30) करण्यात येणार आहे. तसेच धनकवडी येथील शिवशंकर चौक येथे कलवर्टचे काम सुरु आहे. या कामामध्ये अडथळा ठरणारी ७९६ मीमी व्यासाची पाईप लाईन शिफ्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने वडगाव व राजीव गांध पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

तसेच शुक्रवार (दि.३१) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग – सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर इ.

Leave A Reply

Your email address will not be published.