Kondhwa Khurd Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन असभ्य वर्तन, रिक्षाचालकाला अटक

0

पुणे :- Kondhwa Khurd Pune Crime News | रिक्षाचालकाने रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. भररस्त्यात तिचा हात पकडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला (Molestation Case). या प्रकरणी रिक्षाचालकाला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे. हा प्रकार 25 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द येथे घडला आहे.

याबाबत पिडीत मुलीच्या 44 वर्षीय आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक अनिस जमालउद्दीन सय्यद (वय-23 रा. रॉयलपार्क, कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 354(ड), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे (POCSO Act). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची अल्पवयीन मुलगी परिसरातील किराणा दुकानात किराणा सामान आणण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपी अनस सय्यद याने त्याच्या रिक्षातून मुलीचा पाठलाग केला.

अनमोल सुपर मार्केट समोर आरोपीने रिक्षा थांबवून मुलीचा हात पकडला. तिला तिच्या रहात्या घराचा पत्ता विचारून तु मला खूप आवडते असे म्हणून तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. मुलीने घरी येऊन तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी अनस सय्यद याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.