Pune Porsche Car Accident | पुणे ससून ब्लड सॅम्पल प्रकरणातील एसआयटीच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचा आरोप, सरकारचा हेतू चांगला नाही; विरोधी पक्षनेते

0

पुणे : Pune Porsche Car Accident | पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससूनमधील (Sassoon Hospital) दोन डॉक्टरांनी ब्लड सॅम्पलची आदला-बदल (Blood Sample Swapping) केल्याचे उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. आता ब्लड सॅम्पल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अध्यक्षा असलेल्या डॉ. पल्लवी सापळे (Dr Pallavi Saple) यांचीच जेजे रूग्णालयातील (J J Hospital Mumbai) एका प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यामुळे सरकारचा हेतु चांगला नाही, अशा व्यक्तीला चौकशी करायला देणे आम्हाला मान्य नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटले आहे.

अंबादास दानवे यांनी या संदर्भात केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे दिले. मुळात डॉ. सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी, यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता.

यावर चौकशी समिती नेमण्याची घोषणाही सरकारने विधानसभेत केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतू वर शंका आणणारे आहे? ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही.. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.