Swapping Blood Sample In Sassoon Hospital | ‘उंदराला मांजर साक्ष’ ; ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणाऱ्या समितीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेलेच डॉक्टर

0

पुणे: Swapping Blood Sample In Sassoon Hospital | कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. (Kalyani Nagar Accident)

ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.

या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात टाकले, त्यानंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचे भासवत अहवाल दिला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अशातच आत ससूनच्या डॉक्टरांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीतील डॉक्टरांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

त्यामुळे ‘उंदराला मांजर साक्ष’ अशीच काही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे माजी सनदी अधिकारी महेश झगडे (Mahesh Zagade IASx ) यांनी म्हंटले आहे. फेसबुकवर पोस्ट करत झगडे यांनी या समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत ‘त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा ‘असा खोचक टोलाही त्यांनी प्रशासन आणि सरकारला लगावला आहे.

जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे (DR Pallavi Saple) , मुंबईतील डॉक्टर गजानन चव्हाण (Dr Gajanan Chavan), छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर सुधीर चौधरी (Dr. Sudhir Chaudhary) हे समितीत असणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (MLA Yamini Jadhav) यांनी सापळेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.