Porsche Car Accident Pune | पोर्शे कार अपघात : शिंदे, फडणवीस, अजित पवारांना फोन लावला तर सगळं मिटेल, अग्रवाल कुटुंबियांपैकी एकाची पोलीस आयुक्तालयातच अरेरावी

0

पुणे : Porsche Car Accident Pune | हे गरीब लोक कोण आहेत? यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला तर सगळे प्रकरण मिटेल. त्यांच्या नादी का लागत आहेत?, अशा शब्दांत पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांसोबत आलेल्या एका व्यक्तीने पोलीस आयुक्तालयातच अरेरावी केली, तसेच तो पत्रकारांच्या अंगावर धावून गेल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (Kalyani Nagar Accident)

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांचे छोटा राजनसोबत (Chhota Rajan) लागेबांधे असल्याचे एक गंभीर प्रकरण शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले (Shivsena Leader Ajay Bhosale) यांनी पुन्हा एकदा समोर आणल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

आता या प्रकरणात सुद्धा पोलीस चौकशी करत आहेत. सुरेंद्रकुमार अग्रवालवर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे. आता याच प्रकरणात चौकशी करण्यासाठी अग्रवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune CP Office) बोलावले असताना वरील प्रकार घडला.

छोटा राजनशी संबंध असल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आजोबाला चौकशीला बोलविण्यात आले होते. यावेळी अगरवालांच्या कुटुंबातील एका मस्तवाल व्यक्तीने पत्रकारांना अरेरावी आणि धक्काबुक्की केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवारांना (Ajit Pawar) फोन लावून प्रकरण मिटविण्याची धमकी दिली आहे.

याचा व्हिडीओ व्हायरल होत असून संतप्त पत्रकारांनी या व्यक्तीला चांगलाच इंगा दाखवला आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल, बिल्डर विशाल अग्रवाल आणि चालकाला समोर बसवून काही प्रश्न विचारले. तेव्हा आजोबासोबत आलेल्या एका नातेवाईकाने स्वत: वकील असल्याचे सांगत पत्रकारांना उलट सुलट बोलण्यास सुरुवात केली.

हे गरीब लोक कोण आहेत? यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला की सगळे प्रकरण मिटेल. त्यांच्या नादी का लागत आहेत?, अशी अरेरावी केली, आणि तो पत्रकारांच्या अंगावर धावून गेला. यावेळी काही पोलीस या मस्तवाल अग्रवालला वाचविण्यासाठी पुढे आले. या प्रसंगी काही काळ वातावर तणावाचे झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.