Kothrud Pune Crime News | पुणे : प्रेमप्रकरणात तेढ, प्रियकराची प्रेयसीला मारहाण करुन धमकी

18th May 2024

पुणे : – Kothrud Pune Crime News | प्रेमसंबंधात प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाला. यातून प्रियकराने प्रेयसीला मारहाण करुन बघुन घेण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने थेट पोलिसांकडे धाव घेतली. हा प्रकार 10 मे रोजी रात्री साडेबारा वाजता कोथरुड येथे घडला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 28 वर्षीय तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार फैज फोरोज खान Faiz Foroz Khan (वय-28 रा. कचरा डेपो, कोथरुड) याच्यावर आयपीसी 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीवर सी.आर.पी.सी 107 नुसार कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे असून यांच्यात 2022 पासून प्रेमसंबंध आहेत. आरोपी फैज याचे वागणे फिर्यादी यांना आवडत नसल्याने त्यांच्यामध्ये यापुर्वी अनेक वेळा वाद झाले आहेत. 10 मे रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि फिर्यादी भुसारी कॉलनीत (Bhusari Colony) गप्पा मारत बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी फैजला आपण सर्व विषय संपवुन टाकू असे म्हटले. याचा राग आल्याने फैज खान याने फिर्यादीसोबत वाद घातला. त्याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तुला काय करायचे ते कर, मी तुला बघुन घेतो असे म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ (PSI Vaishali Sul) करीत आहेत.