Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मुलाने गाडी चालवायला मागितली तर दे’ विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने जबाबात दिली महत्त्वाची माहिती

0

पुणे : – Porsche Car Accident Pune | पुणे शहरातील कल्याणी नगर भागात भरधाव वेगातील आलिशान पोर्शे कारने दोघांना धडक दिली (Kalyani Nagar Accident Pune) . यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. गुन्ह्यातील आरोपी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Arrest) याच्या चालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्वाची माहिती दिली आहे. मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली असल्याचे चालकाने जबाबात सांगितले आहे.

भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आरोपीने ज्या पबमध्ये मद्यपान केले त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना बुधवारी (दि.22) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पोंक्षे (Judge S.P. Ponkshe) यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल Vishal Surendra Kumar Agarwal (वय 50 रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय-34 रा. एन आय बी एम) आणि जयेश सतीश गावकर (वय-23 रा. केशवनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या पोर्शे कारमधील चालकाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबत चालकाने नमूद केले आहे की, आरोपीचे वडील विशाल अग्ररवाल यांनी त्याला सूचना केली होती की, मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस. या सूचनेनुसार त्याने मुलाला गाडी चालवायला दिली होती, असे जबाब नमूद आहे.

अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल व क्लबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल व क्लबमध्ये दारु मिळते याची माहिती अग्रवाल याला होती. तरी देखील त्याने अल्पवयीन मुलाला पार्टीला जाऊ दिले. पार्टीसाठी जाताना त्याला पॉकेटमनी दिला होता का? पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते अथवा स्वत:चे क्रेडीटकार्ड दिले होते का? अल्पवयीन मुलासोबत पार्टी करताना कोण कोण होते? या संदर्भात आरोपकडे सखोल तपास करुन पुरावे हस्तगत करायचे आहेत. त्यासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्कीवाद सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.

गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची तपासणी न करता मद्यापान करण्याची परवानगी दिली, असे अ‍ॅड. विभुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीच्या वतीने वकिल अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. अमोल डांगे आणि अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने तीनही आरोपींना 24 मे पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.