Devendra Fadnavis On Rahul Gandhi | पुण्याच्या घटनेचं राजकीयकरण केलं हे निषेधार्य, पोलिसांनी योग्य कारवाई केली – देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : – Devendra Fadnavis On Rahul Gandhi | पुण्यातील कल्याणीनगर (Kalyani Nagar Accident) इथं शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर भरधाव वेगान कार चालवणाऱ्या आरोपीला तात्काळ जामीन मंजूर झाल्याने जनभावना तीव्र झाली. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीवर कारवाई करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police) जात या प्रकरणाचा आढावा घेतला. दरम्यान, विरोधकांकडून या घटनेचे राजकारण करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना पुण्यातील घटनेचं राजकीयकरण केलं जातंय हे निषेधार्य असून पुणे पोलिसांनी योग्य तपास करुन कारवाई केल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे अतिशय निषेधार्य आहे. पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली. मात्र त्याच्यामध्ये ज्युवेनाईल जस्टीस बोर्डने तो निर्णय घेतला. त्याच्यावर अपील करुन पुन्हा ज्युवेनाईल बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणली आहे. अशा परिस्थीतीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चेष्म्यातून पहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे योग्य नाही. त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकराचं त्यांनी काम केलं नसतं, असं फडणवीस यांनी म्हटलं. (Porsche Car Accident Pune)

दरम्यान, पुण्यातील घटनेवरुन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ज्यांच्यावर 100 कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप आहे. आणि कोर्टाने ज्यांच्यावर एफआयआर केला आहे अशा व्यक्तीच्या बोलण्यावर माझी कशाला प्रतिक्रिया मागता असा सवाल पत्रकारांना केला.

काय म्हणाले राहुल गांधी?

दोन जणांची हत्या करणाऱ्याला निबंध लिहिण्याची शिक्षा कशी? मग ओला, ट्रक चालकांना निबंध लिहिण्याची शिक्षा देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी दोन हिंदुस्तान तयार करीत आहे, जिथं न्याय देखील श्रीमंतीवर अवलंबून असतो, असं म्हणत राहुल गांधींनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.