Shivsena On Pubs In Pune | पुणे शहरातील पब व बार रात्री बारा वाजेच्या आत बंद करा, पुणे शहर शिवसेनेची मागणी

0

पुणे : – Shivsena On Pubs In Pune | पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दोन आयटी अभियंत्यांना आपल्या आलिशान पोर्शे गाडीखाली चिरडले. ही घटना कल्याणी नगरमध्ये रविवारी (दि. 19) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शहर भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यानंतर आता पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री बारापर्यंतच शहरातील पब व बार बंद करण्याची मागणी केली आहे.

कल्याणी नगर परिसरात हिट अँड रनच्या प्रकारात मद्यधुंद अवस्थेत आलिशान गाडी बेफामपणे चालवत तरुण-तरुणींना बेदरकार पद्धतीने उडविल्याबाबत गुन्हा नोंदविलेला आहे. सदर अपघात हा रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब व बार संस्कृतीमुळे घडला असून पुणे शहरातील सार्वजनिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी शहरातील पब व बार संस्कृतीला आळा घालण्यात अत्यंत आवश्यक आहे. शहरातील सर्व अधिकृत बार व पब हे रात्री 12 नंतर पूर्णपणे बंद असावेत जेणेकरून घडणाऱ्या घटना टाळता येतील अशी मागणी आज पोलीस आयुक्तांना शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्या बाबतही पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. पत्रावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.