Illegal Construction In Pune | अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक महिन्याला स्थायी समोर ठेवावा; महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे बांधकाम विभागाला आदेश

0

पुणे : Illegal Construction In Pune | रविवारी मध्यरात्री कल्याणीनगर येथील बॉलर पब (Ballr Club Pune) समोर बांधकाम व्यावसायीकाच्या (Builder In Pune) मुलाच्या कारच्या धडकेत तरुणीसह दोघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिकेनेही आज अपघाताच्या निमित्ताने पब, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले असून बॉलर पबच्या पाहाणीसाठी देखिल पथक पाठविले होते. तसेच बांधकाम विभागाच्यावतीने अनधिकृत बजावण्यात आलेल्या नोटीसेसवर काय कारवाई करण्यात आली याचा अहवाल दर महिन्याला स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी दिले आहेत.

कल्याणीनगर येथे झालेल्या दोन जणांच्या अपघाती मृत्युनंतर शहरातील पब आणि रुफ टॉप हॉटेलचा (Roof Top Hotel Pune)  विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याणीनगर भागातील नागरीकांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या पब चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात कल्याणीनगर सिटीझन फोरम (Kalyaninagar Citizen Forum) या संघटनेने पोलिस आयुक्तांना (Pune CP) निवेदन दिले आहे. पब प्रमाणेच रुफ टॉप हॉटेलही रात्री उशिरापर्यंत सुरु असतात, यापार्श्वभुमीवर महापालिकेकडून केल्या जाणार्‍या कारवाईसंदर्भात माहीती घेतली असता, पोलिसांना पाठविण्यात आलेल्या पत्राची पत्र मिळाली.

शहराच्या विविध भागात इमारतीच्या टेरेसवर, तसेच सामाईक जागेत शेड उभे करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. यामुळे या भागातील रस्त्यांवर पार्कींगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशीरापर्यंत हे हॉटेल सुरु राहतात, त्यामुळे या भागातील नागरीकांना त्याचा उपद्रव होतो. पार्कींग, ध्वनी प्रदुषण यासंदर्भात नागरीकांकडून सातत्याने तक्रारी येतात. याची दखल घेत महापालिकेने रुफ टॉफ हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. शहरातील ८९ अनधिकृत रुफटॉप हॉटेलपैकी ७६ हॉटेल्सला नोटीस पाठविण्यात आली. त्यापैकी ५३ हॉटेलवर कारवाई केली गेली. सहा हॉटेल मालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेल्सचा वापर बंद झाला आहे. सात हॉटेल्स मालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आहे. तसेच नऊ हॉटेल्सवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलाम ५२ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या हॉटेल्सवर गुन्हा नोंदवूनही त्याचा पुन्हा वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने पुणे पोलिसांना लिहीले होते. त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.

फौजदारी कारवाई करण्याची मागणी

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हा नोंदविल्यानंतरही जागेचा अनधिकृतपणे वापर सुरु ठेवणार्‍या खराडी येथील टेक्सास टॉवर – अमेरीकन ग्रील व बार, हॅकार्स किचन व बार, ७ अ रेस्टारंट व बार, स्पेस फॅक्टरी, ७ स्टड बार अँड लांज,मे. स्काय हाय ५ क्लब, हॉटेल टिक टॉक, हॉटेल क्वार्टर, वडगाव शेरी येथील मे. फुड म्युझिक लव्ह रेस्टारंट बार, व्टीन स्टार एलरो, युनिकॉर्न हाऊस, ए. एम. इंफ्रावैब यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे.

अनधिकृत बांधकामांचा अहवाल स्थायी समोर

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येते. या कारवाई दरम्यान प्रथम नोटीस बजावून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई संदर्भात बांधकाम विभागाच्यावतीने प्रत्येक महिन्याला काय कारवाई केली याचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईमध्ये कुचराई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.