Excavation of Mahametro on Satara Road Pune | ‘मुहुर्त’ साधण्यासाठी महामेट्रोची सातारा रस्त्यावर परवानगीशिवायच खोदाई; महापालिकेने ठोठावला तीनपट दंड

0

पुणे : Excavation of Mahametro on Satara Road Pune | प्रत्येक शुभ कार्याला सुरूवात करताना ‘मुहुर्त’ काढणे ही आपली परंपरा. परंतू कधी कधी हा ‘मुहुर्त’ देखिल आपल्या खिशाला चाट लावतो. असाच काहीसा प्रकार महामेट्रोच्या बाबत घडला आहे. केवळ मुहुर्त साधण्यासाठी पथ विभागाच्या परवानगीशिवायच जिऑलॉजिकल सर्व्हेसाठी रस्त्यावर खोदाई केल्याने महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) महामेट्रोला दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गीकेचा (Pimpri Chinchwad To Swargate Metro Route) पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज असा विस्तार करण्यात येणार आहे. या विस्ताराला केंद्राकडून मान्यता देखिल मिळाली असून पुढील कार्यवाही तांत्रिक प्रक्रियेत आहे. विस्तारीत कामाची निश्‍चिती झाल्याने महामेट्रोने पुणे सातारा रस्त्यावर जिऑलॉजिकल सर्व्हेक्षणही सुरू केले आहे. यासाठी स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या सातारा रस्त्यावरूनच उन्नत जाणार्‍या मार्गावर काम करण्यासाठी माती परिक्षणासाठी नुकतेच महापालिकेकडे अर्ज केला आहे. महापालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही.

मात्र, महामेट्रोने मागील आठवड्यात चांगला ‘मुहुर्त’ शोधून सातारा रस्त्यावर ठराविक अंतराने आठ ठिकाणी बॅरिकेडींग करून सिमेंटच्या रस्त्यावर खोलवर खड्डे खोदून माती परीक्षणाचे काम सुरूही केले आहे. परवानगीशिवायच महामेट्रोने रस्त्यावर खोदाई सुरू केल्याचे पथविभागाच्या निदर्शनास आल्यानंतर महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी तातडीने परवानगीसाठी अर्ज केला आहे. परंतू तोपर्यंत आठ ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. यामुळे पथ विभागाने प्रत्येक खड्डयासाठी सहा हजार रुपये दराने तीनपट अर्थात एका खड्डयासाठी अठरा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही दंडाची नोटीस महामेट्रोला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.