Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बनावट ऑफर लेटर देऊन तरुणीची 6 लाखांची फसवणूक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून (Lure Of Job) तिच्याकडून रोख व ऑनलाईन पैसे घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2024 ते एप्रिल 2024 या कालावधीत वाकड येथील भुमकर चौकातील (Bhumkar Chowk Wakad) झेन बिझनेस सटेंर (Zen Business Center Wakad) येथे घडला आहे.

याबाबत रोशनी सुबोध शिल (वय-28 रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रदीप उर्फ विक्रांत भोसले (Pradeep alias Vikrant Bhosle), परेश पाटील उर्फ सौरभ माने (Paresh Patil alias Saurabh Mane), पल्लवी लोंढे उर्फ प्रगती हजारे (Pallavi Londhe alias Pragati Hazare) याच्यावर आयपीसी 409, 419, 420, 465, 468, 471, 120(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोशनी शिल या नोकरीच्या शोधात होत्या. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. आरोपींनी हिंजवडी फेज -3 (Hinjewadi Phase 3) येथील बॅक्सेस प्रा. लि. कंपनीमध्ये (Backes Pvt. Ltd. Company) चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून रोख व ऑनलाइन सहा लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्य़ादी यांना बनावट ऑफर लेटर देऊन नोकरी लागल्याचे भासवले. फिर्य़ादी यांना ऑनलाइन वर्क फ्रॉम होम कम करण्यास सांगून फिर्यादी व इतरांची फसवणूक केली. ऑफर लेटर बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली. आरोपींनी पैसे परत न करता फिर्यादी यांची सहा लाखांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.