Rajni Tribhuvan | भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

0

पुणे : – Rajni Tribhuvan | पुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज (बुधवार) सकाळी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी त्यांच्या भावाचं निधन झालं होतं म्हणून त्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. रडल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भाऊ आणि बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रजनी त्रिभुवन या 2004 ते 2006 दरम्यान पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात शहरातील अनेक समस्या सोडवल्या. त्यांनी लोकोपयोगी व धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या दूरदृष्टी, हजरजबाबीपणा यामुळे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यांचा सभागृहात दबदबा होता. झोपडपट्टीतून येणाऱ्या त्या पहिल्या महिला महापौर होत्या. रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात पुण्याला सर्वाधिक महिला महापौर मिळाल्या. यामध्ये कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चौधरी, वत्सला आंदेकर, रजनी त्रिभुवन यांचा समावेश आहे. तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून निता राजपूत यांच्यासह इतर महिलांना संधी मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.