Mahadev App Case | महादेव बेटिंग अॅप प्रकरणाचं लोण पुण्यात पोहोचलं, ग्रामीण पोलिसांनी बड्या व्यापाऱ्यासह 70 जणांना घेतलं ताब्यात

पुणे : – Mahadev App Case | महादेव बेटिंग अॅप प्रकरणाचं लोण पुण्यात पोहोचलं आहे. पुण्यातील नारायणगावमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Pune LCB) छापेमारी केली. पोलिसांनी नारायणगाव (Narayangaon) येथील एकाबड्या व्यापाऱ्यासह कुटुंबातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु असताना पोलिसांनी छापेमारी करुन 70 ते 80 जणांना ताब्यात घेतले. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची कामं पुण्यातील नारायणगाव येथील एका इमारतीमधून सुरु असल्याची माहिती समोर आली. यानंतर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
परदेशासह देशातील इतर राज्यात छापेमारी केल्यानंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची पायामुळं पुण्यातील नारायणगावमध्ये सुरु होती. नारायणगाव शहरातील एका इमारतीत काम सुरु होते. संपूर्ण इमारत महादेव अॅपसाठी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नारायणगाव पोलीस ठाण्यात संशयितांची चौकशी सुरु आहे.
अॅप प्रकरणी रोज नवीन माहिती
महादेव बुक अॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. यासंदर्भात ईडीने अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपींनी महादेव बुक अॅप आणि त्याच्याशी संबंधित इतर अॅप्लिकेशन्सद्वारे कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर करुन अमाप मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
शाही लग्नामुळे प्रकार उघड
महादेव बुक अॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकर याने मित्र रवी उप्पलसोबत महादेव ऑनलाईन अॅप सुरु केले. या अॅपवर ऑनलाइन बेटिंग केली जाते. सौरभ चंद्रकारचा फेब्रुवारी 2023 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला होता. या विवाहसोहळ्याला अनेक मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या शाही विवाह सोहळ्यामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या रडारवर आले आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघडकीस आलं.