Pune Crime News | 145 कोटींच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपीला पुणे सीआयडीकडून अटक, 17 वर्ष हैदराबादमध्ये ओळख लपवून वास्तव्य

0

पुणे : – Pune Crime News | नागपूर येथील समता सहकारी बँकेतील (Samata Co-operative Bank Nagpur) गुंतवणुकदारांची तब्बल 145.60 कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणक केल्याने 57 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेल्या आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Pune CID) पथकाने हैदराबाद येथून अटक केली आहे. आरोपी गेली 17 वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

विजयकुमार रामचंद्र दायमा Vijayakumar Ramachandra Dayama (रा. फेअर व्ह्यू सोसायटी. गोदावरी होम्स, सुचित्रा जेडीमेटला, हैद्राबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नागपूर येथील समता सहकारी बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाने बनावट कर्जप्रकरणे सादर करुन 145 कोटी 60 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता. याप्रकरणी नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्यात 2007 मध्ये अपहार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी 57 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती विचारात घेता या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडे सोपवण्यात आला होता. सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात होता. दायमा गेली 17 वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत होता.

दायमा हैद्राबादमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हैद्राबादमधून अटक केली. त्याला नागपूर सीआयडीच्या ताब्यात दिले आहे. सीआयडीच्या पुणे कार्यालयाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, पोलीस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास कोळी, सुनील बनसोडे, प्रदीप चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.