Sanjay Kakade | ‘राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले’ – माजी खासदार संजय काकडे

0

पुणे : Sanjay Kakade | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Lok Sabha Election 2024) महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे (BJP) वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी संजय काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी संजय काकडे यांनी त्यांच्या मनातील सर्व वेदना आणि आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील त्यांना सांगितली.

त्यांना सांगितलेल्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संजय काकडे यांना भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे असे संजय काकडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.