Pune Indapur Crime | पीडीसीसी बँकेच्या खिडकीचे गज तोडून चोरी ! ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस कार्यालयाची केली नासधूस

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Indapur Crime | इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (PDDC Bank) खिडकीचे गज कापून काचा फोडून चोरटा आत शिरला. परंतु, पैसे न मिळाल्याने त्याने बँकेमधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. हार्डडिक्स, स्वीच तसेच भिंतीवरील घड्याळ चोरुन नेले. शेजारीला ग्रामपंचायत कार्यालय,पोस्ट ऑफिस कार्यालये तोडून तेथील कागदपत्रे अस्ताव्यस्त करुन टाकले.

याबाबत बँकेचे व्यवस्थापक दिलीप बलभीम गोसावी (वय ५३) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

बँक बंद असताना चोरट्याने इमारतीचे पाठीमागील बाजूने खिडकीचे गज कापून काचा फोडून आत प्रवेश केला. बँकेचा पुढील बाजूचा दरवाजा उघडला. तसेच बँकेमधील तीन लोखंडी कपाटाचे लॉक तोडले.त्यामधील कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकले. नेटवर्क रँकमधील नेटवर्क स्वीच, हार्डडिक्स, एन व्ही आर, पी ओ ई स्विच तसेच भिंतीवरील घड्याळ असा ४५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.

त्यानंतर चोरट्याने शेजारील ग्रामपंचायतीचे कार्यालय तसेच पोेस्ट ऑफिसमधील क्लार्क कार्यालयाचा दरवाजा तोडून नुकसान केले. आतील कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकून नुकसान केले. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे तपास करीत आहेत.

ACB Trap On Police | 15 हजारांची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Swargate Crime | महिलेचा पाठलाग करुन विनयभंग, एकाला अटक; स्वारगेट परिसरातील प्रकार

Leave A Reply

Your email address will not be published.