Pune News | पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने घबराट; वेबकॉलवरुन केला होता फोन

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –  Pune News | नवी पेठेतील पूना हॉस्पिटलमध्ये (Poona Hospital) बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police) आल्याने गुरुवारी रात्री एकच खळबळ उडाली. सुमारे तासभर संपूर्ण हॉस्पिटलची तपासणी केल्यानंतर हा कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाले. हा फोन वेबकॉलवरुन केला असल्याने त्याचे पोलिसांना अद्याप तपशील उपलब्ध होऊ शकले नाही. (Pune News)

पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. फोन करणार्‍याने पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. याबरोबर पोलीस नियंत्रण कक्षाने सर्वांना अलर्ट केले. विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ बॉम्बशोधक व नाशक पथक पोहचले. त्यांनी संपूर्ण हॉस्पिटल व लगतच्या परिसराची तपासणी केली. संशयास्पद वाटणार्‍या वस्तू, विभागाची बारकाईने तपासणी केली. त्यात कोठेही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. मात्र, यामुळे हॉस्पिटल परिसरात मध्यरात्रीही मोठी गर्दी झाली होती. कोणीतरी खोडसाळपणा करुन पोलीस नियंत्रण कक्षाला चुकीची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणार्‍याचा शोध घेतला जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.