Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहण, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या रगातून दोघांना लाकडी बांबु व विटेने मारहाण करुन जखमी केल्याची घटना भवानी पेठेत घडली आहे. ही घटना चुडामण तालमी जवळ रविवारी (दि.28) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सज्जाद अब्दुल शेख (वय-44 रा. नाना पेठ, एम.डी. कॅम्प चौक, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून अनस फिरोज खान, झिआन फिरोज खान (रा. एमडी कॅम्प चौक, भवानी पेठ) यांच्यावर आयपीसी 324, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा भाचा झैनुल खान हे बोलत थांबले होते. त्यावेळी अनस खान त्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांच्या भाच्याला आईने बोलावले असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा भाचा चुडामण तालम जवळ गेले. त्यावेळी आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरुन सज्जाद यांना लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. तर झिआन खान याने त्याठिकाणी पडलेली विट मारून जखमी केले. तसेच भाच्याला हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.