President’s Medal | उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह सेवेतील 9 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – President’s Medal | उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृहातील अधिकारी (Jail Officers) आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक (President’s Medal) केंद्रीय गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. कारागृह विभागातील नऊ अधिकारी तसेच कर्मचारी यंदाच्या राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले आहेत. कारागृह विभागात वैशिष्टयपूर्ण सेवेबद्दल कोल्हापूर, तळोजा, मुंबई, येरवडा, छत्रपती संभाजीनगर, अकोला मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले आहे.

राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे

  1. रुकमाजी भुमन्ना नरोड (तुरुंगाधिकारी श्रेणी-1, अहमदनगर जिल्हा कारागृह)
  2. सुनिल यशवंत पाटील (तुरुंगाधिकारी श्रेणी-1, तळोजा मध्यवर्ती कारागृह)
  3. बळीराम पर्वत पाटील (सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह)
  4. सतीश बापूराव गुंगे (सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह)
  5. सुर्यकांत पांडूरंग पाटील (हवालदार, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह)
  6. नामदेव संभाजी भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह)
  7. संतोष रामनाथ जगदाळे (हवालदार, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह)
  8. नवनाथ सोपान भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह)
  9. विठ्ठल श्रीराम उगले (हवालदार, अकोला जिल्हा कारागृह)

अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक जाहिर झाल्याबद्दल कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (मु.), कारागृह व सुधारसेवा जालिंदर सुपेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.